प्रिया बापटने कॉपी केली का रिंकूची स्टाईल? इंटरनेटवर फोटो होतायत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:59 IST2022-03-31T18:43:02+5:302022-03-31T18:59:37+5:30

प्रिया बापट आणि रिंकू राजगुरु मराठीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री. या दोन्ही अभिनेत्रींच्या स्टाईलची चर्चा नेहमीच होते. प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या आधी त्याच गेटअपमध्ये तिने गुढीपाडव्याच्या स्टाईल स्टेटमेंटचा व्हिडिओही शेअर केला आहे. मात्र यात गोची अशीय की प्रियाचा हा लुक रिंकुच्या लुकसोबत मिळता जुळता आहे. विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो...

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटला मराठीतील सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

प्रिया सतत आपले नवनवीन लुक ट्राय करत असते. वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशनल प्रत्येक लुक तिच्यावर खुलून दिसतो.

प्रिया बापटने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती गुलाबी रंगाच्या सुंदर शरारा ड्रेसमध्ये दिसून येत आहे. या ड्रेसमध्ये तिचं रूप आणखीनच खुललं आहे.

परंतु हे फोटो पाहून एक वेगळीच चर्चा सुरु आहे.

प्रिया बापटने अभिनेत्री रिंकू राजगुरूचा लूक कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.

कारण यापूर्वी सेम अशाच ड्रेसमध्ये रिंकूसुद्धा दिसली होती. तिनेसुद्धा इन्स्टावर आपले फोटो शेअर केले होते.

या लुकमध्ये रिंकू इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर 'झुंड'चं प्रमोशन करताना दिसून आली होती.