दिलाची राणी! प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, सगळीकडे 'फुलवंती'चीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:35 IST2025-01-29T16:21:58+5:302025-01-29T16:35:11+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरुन प्राजक्ताने हे किलर फोटो शेअर केले आहेत.

लाखो लोकांच्या हृदयाची धडकन म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali). तिचं हसणं, दिसणं, तिच्या अदा सगळंच कातील. प्राजक्तावर लाखो चाहते अक्षरश: फिदा आहेत.
प्राजक्ताचा 'फुलवंती' सिनेमा जोरदार चालला. यामध्ये तिने साकारलेली नृत्यांगना अनेकांना भावली. यानंतर प्राजक्ता आता पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'वाह दादा वाह' म्हणत प्राजक्ताने कायम हास्यजत्रेत आपली छाप पाडली आहे. मोठ्या ब्रेकनंतर हास्यजत्रा पुन्हा सुरु झालं असून प्राजक्ता माळीही परत आली आहे.
प्राजक्ता सध्या सोशल मीडियावर अनडिलीटेड फोटो शेअर करत असते. हास्यजत्रेच्या सेटवर तर ती वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. तिच्या काही लूक्सचं खूप कौतुकही झालं आहे.
आकाशी रंगाच्या साडीत तिने सेटवरील काही फोटो पोस्ट केलेत. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यावर तिने स्लीव्हलेस गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे.
प्राजक्ताचा ब्लाऊज बॅकलेस आहे. तिने मिरर फोटो शेअर केला आहे. तिचे गोल्डन कानातले सौंदर्यात भर घालत आहेत.
प्राजक्ताने या लूकमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. 'रानी' असं कॅप्शनही तिने दिलं आहे. प्राजक्ताच्या फोटोंवर भरभरुन कमेंट्स आल्या आहेत.