Parineeti Raghav Engagement: इशकजादे..!! परिणीती - राघव साखरपुडा थाटामाटात पडला पार, पाहा सोहळ्याचे Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 22:17 IST2023-05-13T22:01:38+5:302023-05-13T22:17:07+5:30
परिणीती-राघव जोडीने दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये साखरपुडा केला.

Parineeti Raghav Engagement: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांचा आज (१३ मे) साखरपुडा पार पडला. फुलांनी आणि दिव्यांनी सजलेल्या दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये त्यांची एंगेजमेंट झाली.
एंगेजमेंटनंतर दोघांचे फोटोज समोर आले आहेत. लग्नाच्या निमित्ताने परिणीतीचे वांद्रे येथील घर जसे सजवण्यात आले आहे, तसेच राघवचे दिल्लीतील निवासस्थानही दिवे आणि फुलांनी सजवण्यात आले आहे.
पाहुण्यांचा थाट वेगळाच होता. अभिनेत्री प्रियांका चोप्रापासून ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान त्यांच्या एंगेजमेंटला पोहोचले.
साखरपुड्याचे निमित्ताने सजवलेले परिणीती अन् राघव खूपच सुंदर दिसत होते.
राघव-परिणितीने शनिवारी नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत एकमेकांना अंगठी घालून साखरपुडा केला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक प्रार्थना 'अरदास'ने झाली. भजन गाऊन दोन्ही पक्ष गुरुद्वाराच्या दिशेने निघाले.
सायंकाळी ५ वाजता शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबच्या काही भागाचे शुकुमणी साहिब यांनी पठण केले. यानंतर प्रार्थना सुरू झाली आणि त्यानंतर साखरपुडा पार पडला. राघव-परिणितीसाठी हा दिवस नक्कीच खास ठरला.