न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:03 IST2025-11-05T13:39:37+5:302025-11-05T14:03:00+5:30

न्यूयॉर्क शहराचे महापौर झालेल्या जोहरान ममदानींची आई बॉलिवूडमधील आशयघन सिनेमांची दिग्दर्शिका आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. जाणून घ्या

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. झोहरान यांचं बॉलिवूडशी खास नातं आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल

जोहरान ममदानींची आई बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आहे. त्यांचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. जोहरान यांच्या आईचं नाव मीरा नायर.

मीरा नायर या बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बोल्ड विषयांमुळे मीरा नायर यांच्या सिनेमांवर बंदीही आणण्यात आली

१९७९ साली सामाजिक विषयांवरील डॉक्यूमेंट्री मीरा नायर यांनी बनवली. आणि तिथूनच त्यांच्या कलाक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.

मीरा नायर दिग्दर्शित 'फायर' या सिनेमावर बंदीची मागणी करण्यात आली होती. या सिनेमात दोन महिलांमधील प्रेमसंबंध दाखवण्यात आले होते. याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेला 'कामसूत्र' या सिनेमावरही सेन्सॉर बोर्डाने बंदी आणली.

मीरा नायर यांची वैयक्तिक आयुष्यात दोन लग्न झाली. १९८१ साली त्यांनी फोटोग्राफर Mitch Epstein सोबत लग्न झालं. परंतु लग्नाच्या दहा वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.

पुढे १९९१ साली त्यांनी मेहमूद ममदानी यांच्याशी लग्नगाठ बांधली. न्यूयॉर्कचे महापौर झालेले जोहरान ममदानी हे मीरा आणि मेहमूद यांचे पुत्र. अशाप्रकारे जोहरान यांचं बॉलिवूडशी खास नातं आहे.