नथीचा 'रूबाब'! पुरे झाला आता नथीचा नखरा म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:31 IST2021-09-29T17:20:06+5:302021-09-29T17:31:46+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच सोनाली कुलकर्णीने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या नाकातील नथीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोनालीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, पुरे झाला आता नथीचा नखरा…आता पाहा माझ्या नथीचा ‘रूबाब’
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकरोबत लग्नगाठ बांधली सोनाली आणि कुणाल लग्नानंतर त्यांच्या हनिमूनसाठी आफ्रिकेत गेले होते.
सोनालीचा पती कुणाल हा फायनान्स क्षेत्रात काम करतो. मूळचा तो लंडनचा पण जॉब साठी दुबई मध्ये स्थायिक झाला आहे.
सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.