Miss Universe 2018: फिलिपिन्सची कॅट्रियोना ‘मिस युनिव्हर्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:48 IST2018-12-18T15:39:34+5:302018-12-18T15:48:43+5:30

बँकॉक येथे रंगलेल्या 67व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत फिलिपिन्सची कॅट्रियोना ग्रे हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला.
या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची नेहल चुडासमा हिला टॉप -20 मध्येही आपले स्थान राखता आले नाही.
93 देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत कॅट्रियोना ग्रे हिने ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट मिळवला.
हा किताब पटकवणारी ती चौथी फिलिपिन्स सौंदर्यवती ठरली आहे.
24 वर्षांची उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचे आव्हान तिच्यासमोर होते.
दक्षिण ऑफ्रिकेची टॅमरिन ग्रीन या स्पर्धेत फर्स्ट रनर अप तर व्हेनेज्युएलाची स्थेफनी गुटरेज सेकंड रनर अप ठरली.
गेल्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’ ठरलेल्या डेमी लेई नेल्स-पीटर्स हिने कॅट्रियोनाच्या डोक्यावर मुकूट ठेवला.