'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहा उर्फ प्रार्थना बेहरेने ब्लू ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, दिसली खूपच स्टनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:45 IST2022-06-22T18:36:53+5:302022-06-22T18:45:30+5:30
Mazi Tuzi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील प्रार्थना बेहरे(prarthana Behere)ने साकारलेल्या नेहाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ( Mazhi Tuzhi Reshimgaath ) या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळवताना दिसत आहे.
या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामतची भूमिका साकारत आहे.
नुकतेच या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडले आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नेहाचा नवा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.
प्रार्थना बेहरे हिने नुकतेच निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
प्रार्थनाने निळ्या ड्रेसवर गळ्यात नेकलेस घातला आहे आणि केस बांधलेले आहेत.
प्रार्थना बेहरेच्या ब्लू ड्रेसमधील फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
प्रार्थना बेहरे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.