'धुरंधर' जर मराठीत बनला तर? माधवनच्या भूमिकेत डॉ. लागू, तर रहमान डकैतच्या भूमिकेत 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:07 IST2026-02-12T17:40:19+5:302026-02-12T18:07:10+5:30

'धुरंधर' सिनेमा ९० च्या दशकातील मराठी अभिनेत्यांना घेऊन बनला असता तर? त्या काळातील दिग्गज अभिनेते कोणत्या भूमिकेत फिट बसले असते... एकदा बघाच

'धुरंधर' सिनेमा ९० च्या दशकातील मराठी अभिनेत्यांना घेऊन बनला असता तर? the_felt_pixel नावाच्या इन्स्टाग्राम पेजने याविषयीचा AI व्हिडीओ बनवला आहे. अजय सन्यालच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू एकदम परफेक्ट शोभले असते.

'धुरंधर'मध्ये गाजलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेत मोहन आगाशे झळकले असते. अक्षय खन्नाने ही भूमिका हिंदीत गाजवली. त्यामुळे मोहन आगाशेंनी त्यांच्या अदाकारीने ही भूमिका मराठीत नक्कीच वेगळ्या उंचीवर पोहोचवली असती

अर्जुन रामपालने साकारलेल्या मेजर इक्बालच्या भूमिकेत अभिनेते रमेश भाटकर शोभले असते. रमेश यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना नक्कीच भावला असता.

'धुरंधर'मधील रहमान डकैतचा विश्वासून डोंगाची भूमिका प्रशांत दामलेंनी साकारली असती. प्रशांत दामलेंचा आजवर कधीही न पाहिलेला लूक यानिमित्ताने बघायला मिळाला असता

'धुरंधर'मधील प्रमुख भूमिका रणवीर सिंगने साकारलेली हमजा मजारी. या भूमिकेत ९० च्या दशकातील हँडसम अभिनेते रविंद्र महाजनी झळकले असते.

जमील जमाली या कपटी, धूर्त राजकारण्याच्या भूमिकेत निळू फुले झळकले असते. 'धुरंधर' सिनेमात राकेश बेदींनी साकारलेली ही भूमिका निळू फुलेंनी मराठीत निश्चितच खुलवली असती यात शंका नाही.

संजय दत्तने साकारलेली चौधरी अस्लमची भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी जिवंत केली असती. सदाशिव यांचा आवाज या भूमिकेसाठी निश्चितच योग्य आहे.