वेब क्वीन मिथिला पालकरच्या ग्लॅमरस अदा पाहून तिच्यावर व्हाल फिदा, SEE PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 16:31 IST2019-06-29T16:30:03+5:302019-06-29T16:31:47+5:30

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.
तिने कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. ती नेहमी तिच्या भूमिकांमुळे चर्चेत येते.
मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली आहे.
'चॉपस्टिक'मध्ये मिथिला निरमाच्या भूमिकेत असून ती चीनी यात्रीकरूंना मार्गदर्शन करताना दिसते आहे.
या चित्रपटात मिथिला व अभय यांच्याव्यतिरिक्त विजय राज देखील मुख्य भूमिकेत आहे.