अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी आहे हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा, माय-लेकीने एकाच मालिकेत केलंय काम

By देवेंद्र जाधव | Updated: June 22, 2025 15:35 IST2025-06-22T15:15:16+5:302025-06-22T15:35:57+5:30

अभिनेते विजू खोटेंची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी हिंदी इंडस्ट्री गाजवत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की शुभा यांची मुलगीही एक अभिनेत्री आहे

शुभा खोटे या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. शुभा यांनी मराठीसह हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत

शुभा खोटे यांचे भाऊ विजू खोटे हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते होते. शुभा खोटे यांची मुलगीही लोकप्रिय अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. शुभा यांच्या मुलीचं नाव आहे भावना.

भावना बलसावर या शुभा खोटेंच्या कन्या. भावना यांनी स्वतःच्या सुंदर अभिनयाने मनोरंजन विश्वात नाव कमावलं आहे.

भावना यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९६७ रोजी झाला. सब टीव्हीवरील गुटर गू या मालिकेतून भावना यांना अमाप लोकप्रियता मिळाली.

सुखी संसाराची १२ सुत्रे, आमच्यासारखे आम्हीच या मराठी सिनेमांमध्ये भावना यांनी काम केलं. भावना यांनी त्यांच्या कारकीर्दीत टीव्ही मालिका जास्त केल्या.

हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत विविध भूमिका साकारणारा लोकप्रिय चेहरा म्हणून भावना यांना ओळखलं जातं. भावना यांनी SNDT कॉलेजमधून शिक्षण घेतलं. शुभा आणि भावना यांनी स्पाय बहू या मालिकेत एकत्र काम केलंय.

भावना यांचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून करण शहा असं त्यांच्या पतीचं नाव आहे. अशाप्रकारे आईच्या पावलावर पाऊल ठेऊन शुभाा यांनी स्वतःचं नाव कमावलं