इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 12:01 IST2025-10-05T11:55:01+5:302025-10-05T12:01:31+5:30

उर्मिला-आदित्यने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव जिजा असं ठेवलं आहे. जिजा आता ७ वर्षांची झाली आहे.

उर्मिला कोठारे-आदिनाथ कोठारे हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. २०११ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी संसार थाटला.

आदिनाथ-उर्मिलाला एक मुलगीही आहे. लग्नानंतर ७ वर्षांनी ते आईबाबा झाले. २०१८मध्ये उर्मिलाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.

उर्मिला-आदित्यने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव जिजा असं ठेवलं आहे. जिजा आता ७ वर्षांची झाली आहे.

दिसायला जिजा तिच्या आईची म्हणजेच उर्मिलाची एकदम कार्बन कॉपी आहे.

उर्मिलाने तिच्या सोशल मीडियावरुन लेकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये आई आणि लेकीमधलं खास बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.

अनेकदा आदित्य कोठारेदेखील जिजासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो.