"हाच तो मुलगा आहे आणि...", अखेर रिंकू राजगुरूने तिच्या लग्न आणि जोडीदाराबद्दल केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:49 IST2025-09-13T17:43:53+5:302025-09-13T17:49:21+5:30
Rinku Rajguru : नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तिने तिचे लग्नाबद्दलचे मत सांगितलं आहे.

रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'सैराट' (Sairat Movie) सिनेमातून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
'सैराट'नंतर बऱ्याच सिनेमात रिंकूने काम केले. ती सिनेमांशिवाय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाबद्दल आणि जोडीदाराबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.
नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तिने तिचे लग्नाबद्दलचे मत सांगितलं आहे.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली, "मी अजून माझा जोडीदार म्हणून कोणी शोधला नाही आहे किंवा मला अजून कोणी तसा मिळाला नाही की ज्याच्याशी मी लग्न करावे."
"आई-बाबा शोधतील, त्यांना कोणी आवडला आणि तो मुलगा मलासुद्धा आवडला तर मी लग्न करेन.", असे ती म्हणाली.
रिंकू पुढे म्हणाली की, "मला जर कोणी मुलगा आवडला तर मी आई-बाबांना सांगणार की हाच तो मुलगा आहे आणि जर तोपर्यंत मला तसा कोणी सापडला नाही तर आई-बाबा शोधतील त्या मुलाशी मी लग्न करणार."
"मी अजिबात फिल्मी नाही. मी खूप भावनिक, अतिविचारी मुलगी आहे. जशा सगळ्या बायका, मुली असतात तशीच मी आहे", असेही यावेळी रिंकू म्हणाली.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, नुकतीच ती सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत 'बेटर हाफची लव्हस्टोरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली
आतापर्यंत रिंकूनं 'झिम्मा २', 'झुंड', 'कागर' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची छाप सोडली आहे