परी म्हणू की सुंदरा... सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:25 PM2023-09-11T13:25:42+5:302023-09-11T14:07:08+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयानं आणि नृत्यानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

अभिनय आणि बहारदार नृत्याने आज ती मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे नवे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

ब्लू ड्रेसमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. सोनालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी अत्यंत सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो चांगलेच आवडले आहेत.

सोनालीने तिचा हा लुक अतीशय ग्रेसफुल पद्धतीने हाताळला आहे. तिच्यातला आत्मविश्वास प्रत्येक फोटोंमधून दिसतो.

या लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. कमेंट सेक्शनमध्ये परी म्हणू की सुंदरा असे चाहते म्हणत आहे, तर कुणी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहे.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. अभिनयाबरोबच सोनाली उद्योजिका देखील झाली आहे.