निळ्या बनारसी साडीतील अप्सरेचे फोटो... दिसतेय झक्कास...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:17 IST2021-09-12T18:12:11+5:302021-09-12T18:17:38+5:30
Sonalee Kulkarni : निळ्या बनारसी साडीतील सोनालीची एक एक अदा वेड लावणारी आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचं साडीवरचं प्रेम चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे.
सोनाली नेहमी साडीतील सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांना वेड लावतात.
आत्ता सोनालीने असेच साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. गणेशोत्सवानिमित्त तिनं हे साडीतील फोटोशूट केलं आहे.
निळ्या बनारसी साडीतील सोनालीची एक एक अदा वेड लावणारी आहे. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
सोनालीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसते आहे.
सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकरोबत लग्नगाठ बांधली सोनाली आणि कुणाल लग्नानंतर त्यांच्या हनिमूनसाठी आफ्रिकेत गेले होते.
सोनालीचा पती कुणाल हा फायनान्स क्षेत्रात काम करतो. मूळचा तो लंडनचा पण जॉब साठी दुबई मध्ये स्थायिक झाला आहे.