PHOTO: सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट; ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसतेय खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 13:33 IST2024-12-04T13:25:36+5:302024-12-04T13:33:08+5:30
अभिनेत्रीने सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हटके अंदाजात फोटोशूट केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' या नावाने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.
सोनाली उत्तम अभिनयासह नृत्यकलेतही पारंगत आहे.
सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे.
त्याद्वारे सोनाली कुलकर्णी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच सोनालीने फोनबुथ फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस, हाय हिल्स अन् मोकळे केस अशा लूकमध्ये ती पाहायला मिळतेय.
सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय.
"Red lips, red heels, red booth while i sparkle in black and gold..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.