सतरंगी रे...! 'फुलवंती'च्या कातील अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:03 IST2025-05-30T15:41:09+5:302025-05-30T16:03:35+5:30

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच गुलाबी रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयासोबत सौंदर्याने ती चाहत्यांना घायाळ करत असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळेही चर्चेत येत असते.

नुकतेच प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने गुलाबी रंगाच्या विविध शेड लेहंग्यात फोटोशूट केलंय.

गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या शेडमधील लेहंग्यावर प्राजक्ताने हॉल्टर नेक ब्लाउज परिधान केला आहे.

या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी शेवटची चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात पाहायला मिळाली. यात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार मंडळी पाहायला मिळाली.

या सिनेमाच्या आधी प्राजक्ता फुलवंती या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.

प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात तिच्यासोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता.