नथीचा नखरा... बालगुडेच्या मराठमोळ्या शृंगारात दिसली महाराष्ट्राची 'संस्कृती'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 08:00 AM2021-08-05T08:00:00+5:302021-08-05T08:00:00+5:30

संस्कृती बालगुडे नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असते. संस्कृती बालगुडेचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली, असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी संस्कृती पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील एक्सप्रेशन रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

संस्कृतीने तिचे हे फोटो शेअर करत खास अशी कॅप्शनही दिली आहे.

“ सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे अशी कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

फोटोसोबत कॅप्शनही समर्पक कॅप्शननेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.