पिळगांवकरांची धम्माल! 'या' देशात एन्जॉय करतायेत सुट्ट्या; श्रियाने शेअर केले फॅमिली ट्रिपचे सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:30 IST2026-03-02T13:22:15+5:302026-03-02T13:30:48+5:30
पिळगांवकर फॅमिली पोहोचली 'या' सुंदर देशात; श्रियाने शेअर केले ट्रिपचे फोटो

सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांच्यासोबत २१ डिसेंबर १९८५ लग्नगाठ बांधली होती. जवळपास या जोडीने आता ४० वर्षांचा संसार केलाय.

सुप्रिया आणि सचिन यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांची लाडकी लेक श्रिया पिळगांवकर हिने एक विशेष फॅमिली ट्रिप प्लॅन केली.

पिळगांवकर कुटुंब सध्या 'व्हिएतनाम'मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून श्रियाने या ट्रिपचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोसोबत श्रियाने अतिशय हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

याबद्दल भावना व्यक्त करताना श्रियाने लिहिले, "कुटुंबासोबतच्या सुट्ट्या म्हणजे एखाद्या चित्रपटासारख्याच असतात—थोडी गडबड, थोडा गोंधळ... पण याच गमतीशीर क्षणांमधून आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणी तयार होतात".

पालकांना आपल्यासोबत सहलीला नेण्याबद्दलचे समाधान व्यक्त करताना ती पुढे लिहिते, "आपल्या आई-वडिलांना आपण स्वतःहून सुट्टीवर फिरायला घेऊन जाणं, ही खूप खास आणि मनाला शांती देणारी भावना असते. धावपळीच्या आयुष्यात कुटुंबाच्या अशा सहलींचे योग जुळवून आणणं खूप कठीण असतं, त्यामुळे जेव्हा कधी अशी संधी मिळते, तेव्हा ती आम्ही कधीही सोडत नाही".

या ट्रिपमधील आपल्या भूमिकेबद्दल गंमतीने सांगताना श्रिया म्हणाली, "आई-बाबांच्या लग्नाच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त मी एका छोट्याशा ट्रिपचं प्लॅनिंग केलं आणि या प्रवासात मी पूर्णपणे 'टूर गाईड'च्या भूमिकेत शिरले होते!".

पिळगांवकर कुटुंबानं व्हिएतनाममध्ये धम्माल केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी बोटिंग आणि सायकलिंगचा आनंद घेतला.

व्हिएतनाममधील प्रसिद्ध 'हनोई स्ट्रीट'ला देखील त्यांनी भेट दिली. तिथले स्थानिक पदार्थ आणि नयनरम्य ठिकाणांनी या कुटुंबाचे लक्ष वेधून घेतले.

४० वर्षांच्या दीर्घ संसारानंतर सचिन आणि सुप्रिया यांचा उत्साह आजही एखाद्या तरुण जोडीसारखा पाहायला मिळत आहे.

पिळगांवकरांच्या व्हिएतनाम ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रियाने शेअर केलेल्या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

















