शनायाचा म्हणजेच रसिका सुनीलचा 'हा' बोल्ड अंदाज पाहून व्हाल क्लिन बोल्ड, बिकिनी फोटोंचा धुमाकूळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 11:03 IST2020-01-07T09:35:45+5:302020-01-07T11:03:56+5:30

रसिका सुनीलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फ्लोरल प्रिंट असलेली बिकनीतील फोटो शेअर केला या फोटोने सोशल मी़डियावर खळबळ माजवली
रसिका सुनील चा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे
या फोटोंवर फॅन्स ची लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.
फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रसिका अमेरिकेत गेली आहे
अमेरिकेत ती शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते
नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायविंगचचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते.
या फोटोंमध्ये रसिकाचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.
रसिका सोशल मीडियावर सक्रिय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.