भाचीला दुबईला फिरायला घेऊन गेली प्रिया बापट, शेअर केले फॅमिली ट्रिपचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:08 IST2025-05-29T16:03:48+5:302025-05-29T16:08:19+5:30
भाचीसोबत जीवाची दुबई! प्रिया बापटचं फॅमिली व्हॅकेशन, पाहा फोटो

प्रिया बापट आणि उमेश कामत हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. नुकतेच प्रिया आणि उमेश फॅमिली ट्रिपसाठी दुबईला गेले होते.
त्यांच्यासोबत प्रियाची बहीण आणि तिची भाचीदेखील होते. दुबई ट्रिपचे फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियाची भाची शरिवा हिची ही पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप होती. प्रियाने भाचीसोबत जिवाची दुबई केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
प्रियाने भाचीसोबत दुबईमध्ये खूप धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे.
भाची आणि परिवारासोबत प्रियाने क्वालिटी टाइम घालवला. दुबईतील प्रेक्षनीय स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.
प्रियासोबत तिचे बाबाही दुबई फिरण्यासाठी गेले होते.
प्रियाच्या दुबईच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.