लग्नानंतर प्रथमेश-क्षितीजाने साजरा केला पहिला गुढीपाडवा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 10:43 AM2024-04-09T10:43:14+5:302024-04-09T10:57:46+5:30

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar : लग्नानंतर प्रथमेशचा पहिला गुढी पाडवा आहे. या निमित्ताने प्रथमेश आणि क्षितीजाने स्पेशल फोटोशूट केले आहे.

काहीच दिवसांपूर्वी प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत थाटामाटात लग्न केले. प्रथमेशच्या लग्नाची खूप चर्चा झाली. प्रथमेशने शेअर केलेल्या व्हिडीओ - फोटोंना चांगलीच पसंती मिळाली होती.

लग्नानंतर प्रथमेशचा पहिला गुढी पाडवा आहे. या निमित्ताने प्रथमेश आणि क्षितीजाने स्पेशल फोटोशूट केले आहे. फोटो शेअर करून प्रथमेशने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश परबने गुढीपाडव्या निमित्त फोटोशूट केले आहे. यात त्याने व्हाइट कुर्ता आणि त्यावर पैठणीचं जॅकेट घातले आहे.

तर क्षितीजाने पिंक रंगाचा कुर्ता घातला आहे. या फोटोशूटमध्ये ते दोघे खूप छान दिसत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

त्याने हे फोटो शेअर करत लिहिले की, संस्कृतीच्या क्षितिजावर, पहाट नवी उजळून आली... आयुष्यात पुन्हा नव्याने, क्षण सोन्याचे घेऊन आली..!!! #पहिला गुढीपाडवा.

प्रथमेश परबच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. चाहते त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश - क्षितीजा यांनी २४ फेब्रुवारीला एकमेकांशी लग्न केले.

या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.

प्रथमेश - क्षितीजा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.