प्राजक्ता माळीला नको 'डोकेदुखी'चं लग्न! 'खोटं बोलणाऱ्या' एक्स-बॉयफ्रेंडला सुनावलेले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:23 IST2025-09-30T13:07:34+5:302025-09-30T13:23:06+5:30

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत तिच्या जुन्या नात्यातील अनुभवांवर आधारित खूप महत्त्वाचे विधान केले आहे. खोटेपणा आणि अप्रामाणिकपणामुळे ती नात्यातून बाहेर पडली, हे तिने स्पष्ट केले.

प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहायला मिळाली. प्राजक्ता माळी सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत तिच्या जुन्या नात्यातील अनुभवांवर आधारित खूप महत्त्वाचे विधान केले आहे. खोटेपणा आणि अप्रामाणिकपणामुळे ती नात्यातून बाहेर पडली, हे तिने स्पष्ट केले.

प्राजक्ताच्या मते, नात्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल तर ते निरर्थक ठरते. ती जुन्या नात्याचा संदर्भ देत म्हणाली, ''खरं बोलण्याची हिंमत नसेल, चूक मान्य करता येत नसेल, तर त्या नात्याला अर्थ उरत नाही.''

समोरच्या व्यक्तीच्या सततच्या खोटेपणामुळे ती खूप वैतागली होती, असे तिने सांगितले.

सोज्वळ चेहरा असलेली ही अभिनेत्री सध्या सिंगल असून, 'डोक्याची मंडई' होणार असेल तर तिला लग्न करायचे नाही, असे तिने ठामपणे सांगितले आहे. तिच्यासाठी आयुष्यात मानसिक शांतता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.

अध्यात्मिक विचारांकडे झुकलेली प्राजक्ता सांगते की, ज्यांच्या शारीरिक, भावनिक किंवा सामाजिक गरजा नसतात, त्यांच्यासाठी नातं टिकवणं केवळ प्रेम आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतं, आणि हे 'कलियुगात' मिळणं खूप कठीण आहे, असे तिचे मत आहे.

या सर्व चर्चांवर प्राजक्ता माळीने केवळ एकच उत्तर दिले, ''जो येईल, तो खराच असायला हवा.'' तिच्या या वक्तव्याने, ती स्वतःच्या मूल्यांवर ठाम असणारी आणि आयुष्याचा ताबा स्वतःच्या हातात ठेवणारी स्त्री म्हणून समोर आली आहे.

२०११ मध्ये 'सुवासिनी' या मालिकेतून प्राजक्ताने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. २०१३ मध्ये 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील 'मेघना देसाई' या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली.

२०१८ पासून ती सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' चे यशस्वीरित्या सूत्रसंचालन करत आहे, ज्यामुळे तिला खूप मोठे स्टारडम मिळाले.

प्राजक्ता माळी उत्तम अभिनेत्रीसोबत कवयित्रीदेखील आहे. तसेच तिचा ज्वेलरीचा बिझनेसदेखील आहे.

'फुलवंती' या ऐतिहासिक ड्रामा चित्रपटात तिने अभिनेत्रीसोबत निर्माती म्हणून देखील भूमिका निभावली आहे.