Party All Night! होणाऱ्या पतीसोबत पूजा झाली रोमँटिक; संगीत नाईटचे Unseen photos समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 08:58 AM2024-02-27T08:58:54+5:302024-02-27T09:05:22+5:30

Pooja sawant: जवळपास १ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पूजा-सिद्धेशने लग्नाचा निर्णय घेतला.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहात आहेत. आतापर्यंत अनेक लोकप्रिय जोड्यांनी लग्नगाठ बांधली आहे. यामध्येच आता लवकरच अभिनेत्री पूजा सावंत लग्न करणार आहे.

पूजा, सिद्धेश चव्हाण याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या तिच्या घरी लग्नाच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे.

नुकताच पूजाचा संगीत, मेहंदी आणि हळदी सोहळा पार पडला. या कार्यक्रमांचे सगळेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

यामध्येच पूजा आणि सिद्धेशने त्यांच्या संगीत सोहळ्याचे काही रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सिद्धेश आणि पूजाने बॉलिवूड गाण्यावर रोमँटिक डान्स सुद्धा केला. विशेष म्हणजे सिद्धेशने पूजाला डान्स करतानाही मस्त साथ दिली.

या संगीत नाईटसाठी पूजाने डिझायनर लेहंगा परिधान केला होता. तर, सिद्धेशने ब्लँक कलरचं ब्लेझर परिधान केलं होतं.

पूजा आणि सिद्धेश यांनी जवळपास १ वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सिद्धेश सध्या ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असून पूजादेखील लग्नानंतर काही काळासाठी तिकडे शिफ्ट होणार आहे. मात्र, कलाविश्वातील तिचं काम ती सुरुच ठेवणार आहे.