"एकदा फसलो की फसलो...", लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल तेजश्री प्रधान स्पष्टच बोलली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:21 IST2025-08-20T13:16:49+5:302025-08-20T13:21:20+5:30

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान अभिनयासोबत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशीपवर आपलं मत मोकळेपणाने मांडले.

तेजश्री प्रधान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.

तेजश्री प्रधान सध्या झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांची तुटेना' या मालिकेत काम करताना दिसते आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे.

तेजश्री प्रधान अभिनयासोबत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशीपवर आपलं मत मोकळेपणाने मांडले.

तेजश्री प्रधानने लिव्ह इन रिलेशनशीप आणि लग्नाबद्दलचं तिचं मत व्यक्त केलं. ती म्हणाली की, ''लग्न ही आयुष्यातील सर्वात गोड गोष्ट आहे.''

''लग्नात फक्त दोन व्यक्ती नाही, तर संपूर्ण कुटुंब एकत्र येतात. सर्वांसमोर तुम्ही एकमेकांना आपलंसं करता आणि हे नातं मनाला एक आधार देतात,'' असे तेजश्रीने सांगितले.

''मला लिव्ह इन रिलेशनशीप कधीच आवडलं नाही. जर मला ते आवडलं असतं, तर माझं आयुष्य आज वेगळं असतं'', असं ती म्हणाली.

तेजश्री पुढे म्हणाला की, ''लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणं म्हणजे नकळत स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. एकदा फसलो की फसलो. त्यामुळे मी तर लिव्ह इनचा सल्ला कधीच देणार नाही.''

तेजश्री मॅट्रिमोनियल साइट्स आणि डेटिंग ॲप्सबद्दल म्हणाली, ''आजकाल या साइट्स एक बिझनेस बनल्या आहेत. दररोज हजारो नावं यात नोंदवली जातात, पण त्यात किती सत्य आहे, याची खात्री नसते.''

''अनेक लोक ट्रायल अँड एररच्या मानसिकतेत असतात, पण नात्याची सुरुवात जबाबदारीने झाली पाहिजे. डेटिंग ॲप्सवर एकट्याने भेटण्याऐवजी, पहिली भेट कुटुंबासोबत का होऊ नये?'', असे तिने म्हटलं.