साडीमध्ये अधिकच खुललं नेहा पेंडसेचं सौंदर्य, चाहते झाले घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:10 IST2022-05-20T16:58:10+5:302022-05-20T17:10:05+5:30
Nehha Pendse: अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत येत असते.
नेहा पेंडसेने नुकतेच इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत नेहा पेंडसे हिने काळ्या रंगाची प्रिंटेंड साडी आणि त्यावर काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह्जचा ब्लाउज परिधान केला आहे. केस बांधलेले असून गळ्यात नेकलेस घातला आहे.
नेहा पेंडसे साडीत खूपच सुंदर दिसते आहे. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
नेहा पेंडसेचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र नुकतेच तिने या मालिकेतून निरोप घेतला आहे. आता या मालिकेत तिची जागा विदिशा श्रीवास्तवने घेतली आहे.
नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली आहे.
नेहा पेंडसेचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.