'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:19 IST2024-04-29T12:05:40+5:302024-04-29T12:19:19+5:30
नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नम्रताने खास लूक केला होता.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत नम्रता प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
नम्रता 'नाच गं घुमा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
सध्या नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नम्रताने खास लूक केला होता.
पिवळ्या रंगाचा पैठणी ड्रेस नम्रताने परिधान करत पारंपरिक लूक केला होता.
नम्रताचे या मराठमोळ्या लूकमधील काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोमध्ये घुमाचा मराठमोळा ठसका पाहायला मिळत आहे. नम्रताने पैठणी ड्रेसवर कानात झुमके आणि नाकात नथही घातली आहे.
ड्रेसच्या मागच्या बाजूला 'नाच गं घुमा' असं सिनेमाचं नावही लिहिलेलं दिसत आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नम्रताने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत.
घुमाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.