मिताली मयेकरच्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन, Photos चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:53 IST2024-09-13T15:46:35+5:302024-09-13T15:53:50+5:30
मितालीचे बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय आहेत. दोघांची फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे.
मितालीच्या खूपच खास फोटोंनी लक्ष वेधून घेतले. यामागचं कारणही अत्यंत खास आहे. 11 सप्टेंबर रोजी मितालीचा २८ वा वाढदिवस दणक्यात साजरा झाला.
मितालीने तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
डीप नेक ब्लॅक ड्रेसमध्ये मितालीचा खूपच बोल्ड दिसत होती. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले होते.
यावेळी बर्थडे गर्ल मितालीने ग्लॅमरस लुक केला होता. फोटोसाठी तिने खास पोझही दिल्या आहेत.
तिने पती सिद्धार्थ चांदेकरसोबतचाही फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांमधील प्रेम दिसून येतंय.
मितालीच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.