Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीने केला कहर! स्वित्झर्लंडमधून शेअर केला बिकिनी लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 15:12 IST2024-07-17T14:59:14+5:302024-07-17T15:12:34+5:30

हातात वाईनचा ग्लास, समोर स्वित्झर्लंडचं मनमोहक दृश्य अन्....

अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची युरोप ट्रीप भलतीच गाजतीये.

वेगवेगळ्या शहरात फिरतानाचे, तिथलं कुझिन एन्जॉय करतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

या ट्रीपमध्ये मितालीचा नेहमीप्रमाणेच हॉट अँड बोल्ड अंदाज बघायला मिळतोय. तिची फॅशन, स्टाईलही नेहमीच लक्ष वेधून घेते.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी युरोपमध्ये स्काय डायव्हिंगचाही अनुभव घेतला. याची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.

दरम्यान या हॉट कपलने स्वित्झर्लंडलाही भेट दिली. मितालीने बिकिनीमधील फोटो पोस्ट करून चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

हातात वाईनचा ग्लास, जकुझी, आणि समोर सुंदर नजारा. स्वित्झर्लंडचं मनमोहक दृश्य तर काही औरच आहे. त्यात मितालीच्या बोल्ड लूकने चार चाँद लावलेत.

मितालीने काळ्या रंगाची स्टायलिश बिकीनी घातली आहे. त्यात तिला शॉर्ट हेअर आणखी शोभून दिसत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'fire' अशा कमेंट्स केल्या आहेत.