'फॅण्ड्री'तील शालू बोल्डनेसमुळे वाढवतीये सोशल मीडियाचं तापमान; पुन्हा हॉट फोटोशूटमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:33 IST2021-12-16T16:29:52+5:302021-12-16T16:33:50+5:30

Rajeshwari kharat: सोशल मीडियावर सक्रीय असणारी राजेश्वरी अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅण्ड्री चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (सौजन्य : राजेश्वरी खरात इन्स्टाग्राम)

फॅण्ड्री या चित्रपटात राजेश्वरीने शालू ही भूमिका साकारली होती.

शाळेत जाणारी साधी सरळ मुलगी असलेली शालू आता मोठी झाली असून तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे.

राजेश्वरी आता प्रचंड बोल्ड झाली असून तिचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असणारी राजेश्वरी अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच राजेश्वरीने एक फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये राजेश्वरीने पेपर प्रिंट असलेला वनपीस परिधान केला आहे.