'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक 'अंजू' आठवतेय का? आता काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:06 IST2025-07-16T16:49:22+5:302025-07-16T17:06:48+5:30

'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक अंजू आठवतेय? जाणून घ्या तिच्याबद्दल...

अभिनेते सचिन खेडेकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची मुख्य भूमिका असलेला 'चिमणी पाखरं' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळजवळ २४ वर्षांचा काळ लोटला आहे. दरम्यान, या चित्रपटात सचिन खेडेकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासह राजशेखर, बाळ धुरी, अंबर कोठारे, नागेश भोसले, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, रमेश देव, तुषार दळवी, रेशम टिपणीस यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपटाची कथा तर मनाला भावनारी होतीच पण त्यासोबतच चित्रपटातील बालकलाकारांनी केलेलं काम सर्वांच्याच पसंतीस उतरलं.

'चिमणी पाखरं' मध्ये भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांना विशेष भावल्या होत्या.

भारती चाटे हिने चित्रपटात नंदिनी आणि शेखरच्या थोरली मुलगी 'अंजू'ची भूमिका वठवली होती. परंतु, त्यानंतर भारती चाटे कलाविश्वापासून दुरावली.

अभिनयापासून दूर जात भारतीने आपलं संपूर्ण लक्ष शिक्षणाकडे दिलं. तिने लंडनमध्ये इंटरनॅशनल बिजनेसमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे.

भारतीने अभिनयासह कोठारे व्हिजनमध्ये एक वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही कामही पाहिलं आहे.

त्यानंतर ही भारतीने आशिष नाटेकरसोबत लग्नगाठ बांधली आणि ती कलाविश्वापासून दुरावली गेली.

भारती आता दोन मुलांची आई आहे. भारती आणि तिचे पती आशिष यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर ‘सायेशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन’ नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली आहे.