PHOTO: दिसते चंद्राची कोर साजरी! हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णीचं झक्कास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:26 IST2024-11-19T14:15:43+5:302024-11-19T14:26:23+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अभिनयाबरोबरच सोनाली तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते
सोनाली कुलकर्णीने 'देऊळ', 'गुलाबजाम', 'अगं बाई अरेच्चा २', 'गारभीचा पाऊस', 'गुलमोहर' अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
तसेच 'दिल चाहता है', 'सिंघम', 'कितने दूर कितने पास', 'अग्निवर्षा', या हिंदी सिनेमांमध्येही ती झळकली आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असते. त्याद्वारे तिचे नवनवीन प्रोजेक्ट्स तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स यामार्फत ती चाहत्यांना देत असते.
नुकतेच इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
हिरव्या रंगाची साडी, नाकात मोत्याची नथ तसेच केसात गजरा माळून सोनालीने शृंगार केला आहे.
"पिया तोसे..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
सोनाली कुलकर्णीचं हे सुंदर फोटोशूट पाहून त्यावर कलाकार मंडळींनीही कमेंट केल्याच्या पाहायला मिळत आहेत.