PHOTO: अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी; सायली संजीवचं मनमोहक रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:29 IST2024-10-17T13:19:15+5:302024-10-17T13:29:29+5:30
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

उत्तम अभिनयाच्या जोरावर सायली अल्पावधीत लोकप्रिय झाली.
सायली सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
सोशल मीडियाद्वारे ती तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने खास अंदाजात फोटोशूट केलं आहे.
सायली संजीवचे हे फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
पांढरा लेहेंगा त्यावर गडद लाल रंगाचा ब्लाऊज अशा लूकमध्ये ती पाहायला मिळते आहे.
शिवाय गळ्यात तन्मणी हार, केसात जगरा माळून तिने सुंदर असं फोटोशूट केलंय.
अभिनेत्रीने सायली संजीवने 'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता', 'मन फकिरा', 'झिम्मा', 'सातारचा सलमान', 'आटपाडी नाईट्स' या चित्रपटांत काम केलं आहे.