क्षणभर विश्रांती! गावाकडे रमली संस्कृती बालगुडे; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 15:24 IST2024-11-05T15:13:55+5:302024-11-05T15:24:21+5:30
संस्कृती बालगुडे सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतेय. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

संस्कृती बालगुडे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिकांधून विविध धाटणीच्या भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं.
सध्या सोशल मीडियावर संस्कृतीचे काही फोटो समोर आले आहेत.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या गावी जाऊन सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.
गावाकडे गेल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या फॅमिलीसोबत वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे.
"So much Nature, So little time..."असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणा आहे. तिने 'पिंजरा' मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं.