ये हसीन वादियाँ...! प्रिया बापटचा सफरनामा, शेअर केले खास फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:14 IST2025-06-18T18:57:52+5:302025-06-18T19:14:26+5:30

प्रिया बापट रमली निसर्गाच्या सानिध्यात; शेअर केले खास फोटो

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

आपल्या कामातून वेळ काढत प्रिया निसर्गाच्या सानिध्यात रमल्याची पाहायला मिळते आहे.

"I find my solace in mountains...", असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

सध्या तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.