होणाऱ्या नवऱ्यासोबत बीचवर रोमँटिक झाली अन्...; मराठी अभिनेत्रीच्या प्री-वेडिंगची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:12 IST2025-01-20T15:06:46+5:302025-01-20T15:12:00+5:30
मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत समुद्रकिनारी रोमँटिक फोटोशूट केलं आहे. याचे फोटो समोर आले आहेत.

मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. रेश्मा शिंदे, हेमल इंगळे, शिवानी सोनार यांच्यानंतर आणखी एक मराठी अभिनेत्री लग्न करण्याच्या तयारीत आहे.
या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू असून सध्या तिच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत समुद्रकिनारी रोमँटिक फोटोशूट केलं आहे. याचे फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने प्रिंटेड ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. नवऱ्यानेही तिला ट्विनिंग केलं आहे.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे तेजश्री जाधव आहे. तेजश्रीच्या घरी लगीनघाई सुरू असून ती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
तेजश्रीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात साखरपुडा केला होता. आता बॉयफ्रेंड रोहन सिंगबरोबर ती लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
तेजश्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रविण तरडे मुख्य भूमिकेत असलेल्या 'बलोच' या सिनेमात ती झळकली होती.
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'अकिरा' सिनेमातून तेजश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने सोनाक्षी सिन्हाबरोबर स्क्रीन शेअर केले होते. काही साऊथ सिनेमांमध्येही तेजश्री झळकली आहे.