गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 05:32 PM2024-04-25T17:32:46+5:302024-04-25T17:36:30+5:30

Sukhada khandkekar: सुखदाने अलिकडेच ऑफ व्हाइट रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली.

सुखदा मराठीसह हिंदी मालिका विश्वातही सक्रीय आहे. आजवर तिने अनेक गाजलेल्या हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

सुखदा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफचे अपडेट चाहत्यांना देत असते.

सुखदा लवकरच स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती माणिक वर्मा यांची भूमिका साकारणार आहे.

सुखदाने अलिकडेच ऑफ व्हाइट रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे.

सुखदाने 'बाजीराव मस्तानी', 'गुरुकूल' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.

सुखदाप्रमाणेच तिचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

अभिजीत खांडकेकर हा सुखदाचा पती आहे. या दोघांनी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली.