अभिनेत्री सोनाली कुलकर्णी Phuket मध्ये लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 05:12 PM2024-02-12T17:12:41+5:302024-02-12T17:23:53+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या 'Phuket' मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

सोनाली कुलकर्णी अर्थात मराठीतील ‘अप्सरा’ नेहमीच आपल्या फॅशनमुळे कायमच चर्चेत असते.

सोनाली अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या गोष्टींमधून आयुष्याचा आनंद घेत असते.

अभिनयासहबरोबरच खाणे आणि फिरणे या दोन गोष्टी सोनालीला खूपच आवडतात.

अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून आपल्याला याचा प्रत्यय येत असतो. सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आल्याचे ट्रॅवल व्लॉग पोस्ट करते.

सध्या सोनाली 'Phuket' मध्ये असून तिने यासंबंधीचे फोटो शेअर केले आहेत. 'Phuket' हे थायलँडमधील सर्वात रोमॅंटिक ठिकाणांपैकी एक आहे.

सोनालीने निळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत. यात ती खूप सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंमधून 'Phuket' चे सौंदर्य पाहायला मिळत आहे.

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

थायलँडमधील सर्वात सुंदर बेटांपैकी एक बेट म्हणजे फुकेट. त्यामुळे तुम्हीही एखाद्या बेटावर जाऊन आपला हॉलिडे एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तर फुकेतमध्ये फिरायला जाण्याचा नक्की प्लॅन करा.