बिकिनीमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:51 PM2024-03-05T16:51:26+5:302024-03-05T16:55:13+5:30

मराठमोळ्या अभिनेत्रीचं बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट, चाहते घायाळ

मराठमोळ्या अभिनेत्रींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतादेखील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्रीने तिचे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने बिकिनी घातल्याचं दिसत आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी स्मिता गोंदकर आहे. स्मिताचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अनेकदा स्मिता तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. आताही स्मिताच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गॉगल लावून स्मिताने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'पप्पी दे पारूला' या गाण्यामुळे स्मिता प्रसिद्धीझोतात आली होती. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

'बिग बॉस मराठी'मध्येही स्मिता सहभागी झाली होती. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.