उफ्फ् तेरी अदा! शिफॉन साडीत श्रुती मराठेचं मनमोहक फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:23 PM2022-08-08T18:23:30+5:302022-08-08T18:29:03+5:30

Shruti Marathe: श्रुतीला 'राधा ही बावरी' या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे श्रुती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारी श्रुती सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.

बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करणाऱ्या श्रुतीने यावेळी शिफॉन साडीतील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

श्रुतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने राखाडी रंगाची शिफॉनची साडी नेसली आहे.

या साडीवरील लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलकासा मेकअप आणि मोजके दागिने परिधान केले आहेत.

सनई चौघडे या चित्रपटातून श्रुतीने २००८ साली कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता ती लोकप्रिय झाली.

श्रुतीला राधा ही बावरी या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

मराठी कलाविश्वाप्रमाणेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. २०१६ साली आलेल्या बुधिया सिंग बॉर्न टू रन या चित्रपटात ती झळकली आहे.

श्रुती रमा माधव, तप्तपदी, पुणे-मुंबई-पुणे २ या गाजलेल्या चित्रपटांमध्येही झळकली आहे.