"दिसते मी भारी राजा...", लाल साडी अन् केसांत गजरा, सईवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:03 IST2024-07-05T13:57:22+5:302024-07-05T14:03:04+5:30

लाल साडी अन् केसांत गजरा, बोल्ड अँड ब्युटिफूल सईचा मराठमोळा लूक

सई ताम्हणकर ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच सईने बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप पाडली आहे.

अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सईचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन सई चाहत्यांना अपडेट्स देत असते.

नुकतंच सईने मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये सईने लाल रंगाची पैठणी नेसून पारंपरिक लूक केला आहे. केसांत गजरा माळलेल्या सईच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

यावर सईने लांब बाह्यांचा ब्लाऊज घातला आहे. कानात झुमके घालत तिने मराठमोळा लूक केला आहे.

नेहमी बोल्ड अँड ब्युटिफूल दिसणाऱ्या सईचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ", "साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा!" अशा कमेंट केल्या आहेत.

सई लवकरच नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.