डीप नेक टॉप अन् दिसतेय हॉट! प्रार्थना बेहेरेचा कधीही न पाहिलेला बोल्ड अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:51 PM2024-04-11T13:51:51+5:302024-04-11T14:29:51+5:30

मराठमोळ्या प्रार्थना बेहेरचा भलताच बोल्ड अंदाज, पाहा अभिनेत्रीचे हॉट फोटो

प्रार्थना बेहेरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थनाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं.

'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर आणि मिसेस सदाचारी', 'मितवा' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये प्रार्थनाने काम केलं आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटोही शेअर करताना दिसते.

नुकतंच प्रार्थनाने इन्स्टाग्रामवरुन गोवा व्हॅकेशन ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

प्रार्थनाने या फोटोंमध्ये डीप नेक टॉप घातला आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

प्रार्थनाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

फोटोतील प्रार्थनाचा भलताच बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.