'पछाडलेला' चित्रपटातील श्रेयसची ऑनस्क्रिन प्रेयसी आता कशी दिसते? २१ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:24 IST2026-01-09T16:14:39+5:302026-01-09T16:24:05+5:30

'पछाडलेला' चित्रपटातील श्रेयसची ऑनस्क्रिन प्रेयसी आता दिसते फारच वेगळी,'या'लोकप्रिय मालिकेत करतेय काम

२००४ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.या हॉरर सिनेमाचं दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं. या चित्रपटाची आगळीवेगळी पण थरकाप उडवणारी कथा सगळ्यांच्या पसंतीस उतरली.

'पछाडलेला'चित्रपटात दूर्गा मावशीची लेक श्रेयसची प्रेयसी म्हणजेच मनीषा नावाची व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने साकारली आहे. या चित्रपटात अश्विनीने साकारलेली भूमिका अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे.

पछाडलेला सिनेमात दिसणारी ही अभिनेत्री पूर्वीपेक्षा आता फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. अश्विनी सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

सध्या अश्विनी 'वचन दिले तू' मला या स्टार प्रवाहवरील नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत ती शैलजा नावाची भूमिका साकारते आहे.

अश्विनीने तिच्या करिअरमध्ये 'गोविंदा', 'विठ्ठल माझा सोबती', 'घे डबल', 'व्हॉट्स अप लग्न', 'फुलराणी', 'बापू वीरू वाटेगावकर', '८ दोन ७५' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.