कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:30 IST2025-05-22T11:01:38+5:302025-05-22T11:30:43+5:30
अभिनेत्री नेहा पेंडसेला करिअरमध्ये पहिल्यांदाच कान्समध्ये जाण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं आहे. नेहाचा कान्स लूक चांगलाच व्हायरल झाला आहे

मराठीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहा अनेक गोष्टीमुळे सतत चर्चेत येत असते.
मराठीबरोबरच हिंदी कलाविश्वदेखील गाजवणारी नेहा पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकली आहे.
नेहा कान्समध्ये पहिल्यांदाच गेली असून तिने या फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. कान्समधील नेहाचा रेड कार्पेट लूकही समोर आला आहे.
ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये समुद्रकिनारी नेहाने खास फोटोशूट केलंय. कान्समध्ये मराठमोळ्या नेहाने खऱ्या अर्थाने रेड कार्पेट गाजवलं आहे.
नेहाचा हा पहिला कान्स लूक असून ती अजून दोन वेगवेगळ्या आणि तितक्याच आकर्षक लूक्समध्ये दिसणार आहे.
नेहाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलचा लूक समोर येताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेहाचा ग्लॅमरस लूक सर्वांना आवडलेला दिसतोय
नेहाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसोबत हिंदी इंडस्ट्रीतही स्वतःची छाप पाडली. कान्समध्ये पहिल्यांदाच झळकण्याची संधी मिळालेली नेहा तिच्या खास लूकने रेड कार्पेट गाजवेल यात शंका नाही.