एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:47 IST2025-11-12T13:43:47+5:302025-11-12T13:47:59+5:30
सध्या नॅशनल क्रश असलेल्या गिरिजाचं वय कितीये हे तुम्हाला माहितीये का?

सध्या सोशल मीडियावर निळ्या साडीतील मराठी अभिनेत्रीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक आहे. गिरिजा रातोरात नॅशनल क्रश बनली आहे.

गिरिजाने एका मुलाखतीसाठी हा खास लूक केला होता. निळी साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केला होता.

केस मोकळे सोडल्याने गिरिजाचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं. गिरिजाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

गिरिजा ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गिरिष ओक यांची मुलगी आहे. तिने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

अनेक जाहिरातींमध्ये गिरिजा दिसली होती. तर शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमात गिरिजा महत्त्वाच्या भूमिकेत होती. तेव्हा ती चर्चेत आली होती.

सध्या नॅशनल क्रश असलेल्या गिरिजाचं वय कितीये हे तुम्हाला माहितीये का? गिरिजा ही ३७ वर्षांची आहे.

गिरिजाने २०११ साली सुहृद गोडबोले यांच्याशी लग्न करत संसार थाटला. तिला एक मुलगादेखील आहे.

















