मराठमोळ्या अभिनेत्रीची 'पहाडी सफर'; भाग्यश्री मिलिंदची उत्तराखंडातील मंदिरांना खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:14 IST2025-01-07T16:46:45+5:302025-01-07T17:14:27+5:30
आनंदी गोपाळ फेम भाग्यश्री मिलिंदने उत्तराखंडातील मंदिरांना भेट दिली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (bhagyashree milind)

भाग्यश्री मिलिंद ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. भाग्यश्रीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री मिलिंदने नुकतीच उत्तराखंडातील देवीच्या मंदिराला भेट दिली. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले
उत्तराखंडातील सुरकांडा देवी मंदिर, चंबा देवी मंदिर अशा खास मंदिरांना भाग्यश्रीने भेट दिलीय. भाग्यश्रीच्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंती दिलीय
"पहिल्यांदा आपण जातो दुसऱ्यांदा पहाड आपल्याला बोलवतो", असं खास कॅप्शन भाग्यश्रीने या फोटोंना दिलंय
भाग्यश्री मिलिंदला आपण बालक पालक, आनंदी गोपाळ अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. भाग्यश्री शूटिंगमधून वेळ काढत भटकंती करताना दिसते
भाग्यश्री मिलिंदने काहीच दिवसांपूर्वी अनन्या नाटकात काम केलं. या नाटकाद्वारे भाग्यश्रीने गुजराती रंगभूमीवर काम केलंय
भाग्यश्री मिलिंदने कॉलेजमधील एकांकिका स्पर्धांमधून काम करत स्वतःची ओळख मिळवली. आज भाग्यश्री मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे
भाग्यश्री मिलिंद रिअल लाइफमध्ये सिंगल आहे. भाग्यश्री मिलिंद सध्या नाटक आणि सिनेविश्वात चांगलीच सक्रीय आहे.