लंडनमध्ये चंद्राची हवा; स्टायलिश लूकमध्ये अमृताने शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 03:43 PM2024-05-24T15:43:12+5:302024-05-24T15:47:37+5:30

Amruta khanvilkar: सध्या अमृताचा व्हेकेशन मूड ऑन असून ती विदेश दौऱ्यावर आहे. अमृता तिच्या मित्रपरिवारासोबत लंडनला गेली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (amruta khanvilkar). उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने अल्पावधीत प्रेक्षकांची मन जिंकली.

मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने तिचं नशीब आजमावलं आहे.त्यामुळे आज इंडस्ट्रीमध्ये तिचं नाव कायम चर्चेत येत असते.

राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. इतकंच नाही तर 'लुटेरे' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने आता ओटीटीवरही पदार्पण केलं आहे.

अमृता अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना आहे. कोणताही डान्स ती अत्यंत सुंदरपणे सादर करते.

सध्या अमृताचा व्हेकेशन मूड ऑन असून ती विदेश दौऱ्यावर आहे. अमृता तिच्या मित्रपरिवारासोबत लंडनला गेली आहे.

अमृताने लंडन दौऱ्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती कमालीची स्टायलिश लूकमध्ये दिसून येत आहेत.

काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.