गोल्डन रंगाच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये अमृताचं ग्लॅमरस फोटोशूट; चंद्राचे फोटो पाहून नेटकरी होतायेत घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 06:35 PM2022-07-25T18:35:58+5:302022-07-25T18:40:58+5:30

Amruta khanvilkar: अलिकडेच अमृताने एक नवीन फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

उत्तम अभिनयासह नृत्यकौशल्यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

काही दिवसांपूर्वीच अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अमृताने मुख्य भूमिका साकारली आहे.

चंद्रमुखी या चित्रपटामुळे सध्या अमृता मराठीतील चंद्रा या नावाने चर्चेत येताना दिसते.

अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच अमृताने एक नवीन फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

अमृताने गोल्डन अँड व्हाइट रंगाच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

अमृताच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत असतात.

वेस्टर्न असो वा पारंपरिक कोणत्याही आऊटफिटमध्ये अमृता सुंदर आणि मनमोहकच दिसते.