श्याम गुलाबी...! 'दगडू'ची पत्नीसोबत रोमॅन्टिक डेट; 'या' ठिकाणी गेलाय फिरायला, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:47 IST2025-11-23T16:36:41+5:302025-11-23T16:47:26+5:30
इक दुजे के लिए...! पत्नीसोबत रोमॅन्टिक झाला परबांचा प्रथमेश, शेअर केले खास फोटो

'टाईमपास', 'बालक पालक', 'टकाटक' आणि 'उर्फी' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब.

प्रथमेशने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

वैयक्तिक आयुष्यात प्रथमेश परबने २०२३४मध्ये क्षितीजा परबसोबत लग्नगाठ बांधली. सध्या हे जोडपं त्यांच्या सुखी संसारात व्यस्त आहे.

अशातच प्रेक्षकांचा लाडका ‘दगडू’ आपल्या कामातून वेळ काढत पत्नीसह भ्रमंती करताना दिसतोय. प्रतीजाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

प्रथमेश आणि क्षितीजा पुण्याला फिरण्यासाठी गेले आहेत. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोंना अभिनेत्याने "श्याम गुलाबी...", असं खास कॅप्शन दिलं आहे.

















