अतुल कुलकर्णीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; मराठीसह हिंदी कलाविश्वात कमावतीये नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:00 AM2022-06-08T07:00:00+5:302022-06-08T07:00:06+5:30

Atul kulkarni:सध्या सोशल मीडियावर अतुल कुलकर्णीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. अतुलप्रमाणेच त्याची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दर्जेदार अभिनयशैली म्हणजे काय हे अभिनेता अतुल कुलकर्णीकडे पाहिलं की लक्षात येतं.

कोणतीही भूमिका उत्तमरित्या पार पाडण्याचं कौशल्य अतुल कुलकर्णीमध्ये असल्यामुळे आज तो लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.

मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अतुल झळकला आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते.

सध्या सोशल मीडियावर अतुल कुलकर्णीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. अतुलप्रमाणेच त्याची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अतुलच्या पत्नीचं नाव गीतांजली असं असून या दोघांचं लव्हमॅरेज आहे. १९९३ मध्ये एनएसडीमध्ये अतुल आणि गीतांजली यांची पहिली भेट झाली. या मैत्रीचं प्रेमात आणि नंतर लग्नात रुपांतर झालं.

२९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात या दोघांनी लग्न केलं.

गीतांजलीदेखील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मराठी, हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ती रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.

‘सेक्स, मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप’, ‘गजब कहानी’, ‘ड्रीम्स ऑफ तलीम’, ‘पिया बहुरुपिया’ यांसारख्या नाटकांमध्ये तिने काम केलं आहे.

'कोर्ट' या सिनेमात गीतांजली कुलकर्णी यांनी ‘नूतन’ या पब्लिक प्रोसिक्युटरची भूमिका साकारली होती.

गीतांजली सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.