महेश मांजरेकरांच्या लेकीचा नादखुळा! गौरी इंगवलेचं हटके फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 12:30 IST2024-04-16T12:25:13+5:302024-04-16T12:30:54+5:30
Gauri Ingawale : गौरी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने निळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

गौरी इंगवले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
गौरी ही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मानसकन्या आहे.
गौरीला महेश आणि एका डान्सिंग शोमध्ये पाहिलं आणि तिला आपल्या कुटुंबात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.
गौरी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने निळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.
गौरीने नालंदा विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे. ती नृत्यविशारद आहे. अभिनयात करिअर करावं असं तिच्या स्वप्नातही नव्हतं.
गौरीला नृत्यातच आपलं करिअर करायचं होतं. मात्र महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. आता ती उत्तम काम करत आहे.
गौरीने '३:५६ किल्लारी', 'कुटुंब', 'दे धक्का २' आणि पांघरूण' चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आता ती 'वेदात मराठे वीर दौडले सात' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्यासोबतच तिचा निरवधी हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.